मीरा रोड विधानसभेचे नवनियुक्त आमदार नरेंद्र मेहता यांची त्यांच्या सेव्हन इलेव्हेन क्लब येथे आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले यावेळी सोबत धडक कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. मुरली पणीकर उपस्थित होते.
धडक कामगार युनियन ने नरेंद्र मेहता यांना विधानसभा निवडणूकीत पाठिंबा जाहीर केला होता. स्वतः अभिजीत राणे यांनी मीरा रोड येथील औद्योगिक वसाहतीत युनियन सभासदांच्या चौक बैठका तसेच व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मेहता यांच्यासाठी सर्व कामगारांना आवाहन केले होते. त्यांच्यावतीने आज अभिजीत राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments