मालाड, कासमबाग येथे श्री. राजेश म. पाटोळे ह्यांचा धडक कामगार युनियन महासंघ चे मालाड तालुका कार्यालयाचा उद्धघाटन व शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणून धडक कामगार युनियन महासंघ चे संस्थापक आणि महासचिव तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते, मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय व आदरणीय श्री. अभिजीत राणे साहेब ह्यांची उपस्थिती वंदनीय राहिली तसेच ह्या आनंदमयी सोहळ्याला भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते आणि बोरिवली विधानसभाचे माजी आमदार माननीय श्री. सुनील राणे साहेब ह्यांनी भेट घेतली आणि कार्यालयचा उद्धघाटन, शुभारंभ सोहळाचा आनंद द्विगुणित केला. ह्या कार्यक्रमाचे अचैत्या लक्षात घेऊन सन्माननीय, आदरणीय श्री. अभिजीत राणे साहेब ह्यांनी उपस्थित सन्माननीय मा. आमदार सुनील राणे साहेब ह्यांच्या सह शुभारंभाची माळ (रिबीन) कापत कार्यालयाचा शुभारंभ केला.
सन्माननीय श्री. अभिजीत राणे साहेब ह्यांच्या आशीर्वादाने आणि आज्ञेने सन्माननीय श्री. सुनील राणे साहेब ह्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याचा मान धडक कामगार युनियन महासंघ चे मालाड तालुका अध्यक्ष श्री. राजेश पाटोळे ह्यांना भेटला तर उत्तर मुंबई उपाध्यक्ष श्री. संदेश निवंगुने ह्यांच्या हस्ते सन्माननीय श्री. अभिजीत राणे साहेब ह्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सन्माननीय. श्री. अभिजीत राणे साहेब आणि श्री. सुनील राणे साहेब ह्यांनी मालाड तालुका कार्यालयाच्या शुभारंभ निमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या. त्यावेळी धडक कामगार युनियन महासंघ चे मुंबई सरचिटणीस मा. श्री. रविदादा बनसोडे, इन्कमटॅक्स अँड GST युनिट अध्यक्ष श्री. झुल्लूरजी यादव, उत्तर मुंबई उपाध्यक्ष श्री. संदेश निवंगूने, मालाड विधानसभा अध्यक्ष श्री. सादिक भाई शेख, पत्रकार श्री. सिद्धार्थ काळे, युनियन पदाधिकारी श्री. उपेंद्रजी पंडित, धडक कामगर युनियन रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. मोहन जाधव, मालाड रमेश हॉटेल ऑटो रिक्षा स्टँड चे अध्यक्ष श्री. रहीम शेख,नईम शेख, बलराज आणि अनेक अनेक शुभचिंतक ह्यावेळी उपस्थित राहिले.
Comments