महाराष्ट्राचे आशा - श्रद्धा - प्रेरणास्थान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल धडक कामगार युनियन महासंघ चे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात "धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन"च्या रिक्षाच्या "धडक लोटस रिक्षा स्टॅंड युनिट"च्या रिक्षा चालकांसोबत जल्लोष साजरा केला.अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित रिक्षा चालकांना संबोधित केले, आज आपण आपल्या युनियनचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत. लवकरच देशाचे वाणिज्य मंत्री सन्मा. पियुषजी गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालकांचा आपण मेळावा घेणार आहोत. आपल्या स्टॅंड संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या आपण कार्यालयात येऊन कळवाव्यात त्यावर नक्की तोडगा काढू. असे यावेळी ते म्हणाले.कार्यक्रमास यावेळी स्टॅंडचे अध्यक्ष शिवलाल यादव, उपाध्यक्ष अमित नारळे, संजय पाटील, संतोष यादव, सय्यम खरवार, नारायण गोळे, संतोष पाटील, जयप्रकाश पाल तसेच युनियनचे पदाधिकारी बबन आगडे, विकी परेरा, रवी बनसोडे, बी के पांडे, विशाल मोरे, सिद्धार्थ काळे, भास्कर जाधव, संदेश गुणे, राजेश पाटोळे , बलराज वाल्मिकी, प्रकाश मोरया, नईम खान, सहाज शेख, सत्यविजय सावंत, निखिल वरूण, सहाज शेख, गणेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.#DevendraFadanvis #abhijeetrane #photo #jalloshganpatibappachyaaagmanacha
top of page
bottom of page
Comments