धडक कामगार युनियनच्या रसायनी येथील मे. रेन्युसेस इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या युनिटच्या फलकाचे आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते आज पार पडले. यावेळी युनिटचे अध्यक्ष रोशन गावडे, उपाध्यक्ष सचिन कुरगले, सेक्रटरी अर्जुन कुरगले, खजिनदार विशाल राठोड आदी उपस्थित होते.
अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित कामगारांना संबोधित करताना, आपली लढाई आता सुरु झाली आहे. आपली युनियन कायदेशिर प्रक्रियेवर विश्वास ठेऊन काम करते. कंपनी प्रशासनाबरोबर आपण पत्र व्यव्हार सुरु केला आहे. काही कामगारांना कंपनीने काढले असल्याचे मला समजले. बेकायशिर गोष्टी कोणीही करु नये असे माझे कंपनी प्रशासनास आवाहन आहे. आपण सर्व कामगारांनी आता ‘धडक’चे प्रतिनिधीत्व घेतले आहे, त्यामुळे आपला लढा आता युनियनचा लढा झालेला आहे. युनियनचा प्रत्येक पदाधिकारी व महाराष्ट्रातील साडे सात लाख सभासद आपल्या पाठिशी आहेत याची प्रत्येक कामगाराने नोंद घ्यावी, त्यामुळे विजय आपलाच होणार आहे. असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी युनियनचे पदाधिकारी फरीद शेख, बी के पांडे, बबन आगडे, विशाल मोरे, रवि बनसोडे, राजेश पाटोळे आदी पदाधिकारी तसेच युनिटचे कार्यकारिणी सदस्य गणेश पाटील, सुरेश गडगे, चंद्रकांत पाटील व स्थानिक शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments