धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे दुग्ध शाळेचे मुख्य कार्यकारी तसेच प्रभारी व्यवस्थापक संजय ठाकरे यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली व कामगारांना मार्गदर्शन केले. अभिजीत राणे यांच्या हस्ते संजय ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
कामगारांच्या प्रश्नांवर आरे प्रशासनाबरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा पार पडली. यावेळी सोबत महेंद्र गांगुर्डे, सुरेश खंडागळे, रवींद्र जगताप, अनिरुद्ध पाटणकर महादेव वाळकुंडे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
Comments