धडक कामगार युनियन’च्या प्रचार प्रसारात पत्रकारांचे मोठे योगदान : कामगार नेते अभिजीत राणे
--------
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धडक कामगार युनियन आयोजित दीपावली पत्रकार स्नेह सम्मेलन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास अतिथी म्हणून पत्रकार व आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, दै. मुंबई मित्रच्या संपादिका अनघा राणे, प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन, वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि. चे सीईओ अमोल राणे उपस्थित होते. विशेष आमंत्रित अतिथी म्हूणन प्रसिध्द शनि उपासक राष्ट्र संत महामंडलेश्वर श्री 1008 दादू महाराज, दिंडोशीचे आमदार सुनिल प्रभू, युवासेना (उभाटा)चे सचिव अमोल किर्तीकर आदी उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला व आशिर्वाद घेतला कार्यक्रमात मुंबई व उपनगरातील तब्ब्ल 500 हुन अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये दैनिक साप्ताहिक, न्यूज चॅनल, यूट्यूब चॅनल चे पत्रकार, संपादक उपस्थिती होते. यावेळी सर्व पत्रकारांना दीपावली निमित्त भेट वस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
अभिजीत राणे यांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देताना त्यांनी, धडक कामगार युनियनच्या प्रचार प्रसारात पत्रकार बांधवांचा खूप मोठा वाटा आहे. पत्रकार बांधवानी वेळोवेळी धडक कामगारची आंदोलने व कार्यक्रमांना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका निभावलेली आहे. दीपावली हे एक निमित्त आहे त्यांच्याशी चर्चा करण्याचे असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार राजेश विक्रांत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडक कामगार युनियनच्या कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.
Yorumlar