धडक कामगार मालक युनियनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आशा - श्रद्धा - प्रेरणास्थान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य-दिव्य जल्लोष!===== धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत "धडक कामगार युनियन"च्या "धडक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट"च्या वन कामगारांसोबत उद्यानामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित वन कामगारांना संबोधित केले, आपल्या हक्काची व्यक्ती आज राज्याच्या प्रमुख पदी बसली आहे. माझे राज्याचे नवनियुक्त वन मंत्री गणेशजी नाईक यांच्या सोबत बोलणे झाले आहे. आपण लवकरच आपल्या समस्यांचे निवेदन व मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती त्यांना केली असल्याचे असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सर्व वन कामगारांना यावेळी दररोजच्या वापरासाठी पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास यावेळी धडक कामगार युनियन च्या वन प्रभागचे महाराष्ट्र अध्यक्ष जॉनी वायके, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिटचे सचिव रमेश धुरी, कार्यालयीन अध्यक्ष भगवान तांदळकर तसेच युनियनचे पदाधिकारी पदाधिकारी व शेकडो वन कामगार उपस्थित होते.#DevendraFadanvis #abhijeetrane #photo #jallosh #borivali #nationalPark
top of page
bottom of page
Comments