धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आशा - श्रद्धा - प्रेरणास्थान *मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस* यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य-दिव्य जल्लोष! ===
- dhadakkamgarunion0
- Dec 25, 2024
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातून
महाराष्ट्राचे आशा - श्रद्धा - प्रेरणास्थान
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य-दिव्य जल्लोष!
=====
धडक कामगार युनियन महासंघ चे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात "धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन"च्या रिक्षाच्या "बोरीवली गेट क्र. १"च्या रिक्षा चालकांसोबत जल्लोष साजरा केला.
अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित रिक्षा चालकांना संबोधित केले, देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणे म्हणजे आपल्या परिवाराचा प्रमुख मुख्यमंत्री झाला आहे. आपले हक्क व मागण्या आपण आता अधिक ताकदीने मागू शकतो व ते आपल्याला समजून घेतील. आपल्या स्टॅंड संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या आपण कार्यालयात येऊन कळवाव्यात त्यावर नक्की तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमास यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे तुकाराम नाईक, विनोद मोरे, विष्णू परब, चंदू राऊत, समाधान गायकवाड, प्रविण मोहिते, उमेश सावंत तसेच युनियनचे पदाधिकारी फरीद शेख, बबन आगडे, विकी परेरा, रवी बनसोडे, सिद्धार्थ काळे,भास्कर जाधव, संदेश गुणे, राजेश पाटोळे , बलराज वाल्मिकी, प्रकाश मोरया, नईम खान, सहाज शेख, सत्यविजय सावंत, निखिल वरूण, सहाज शेख, गणेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.



































































Comentários