छावा क्रांतिवीर सेनेचे अकरावे राष्ट्रीय महा अधिवेशन – मा. अभिजीत राणे साहेबांना सादर निमंत्रण आज गोरेगाव,मुंबई येथे मुंबई मित्र समूहाचे संपादक व प्रख्यात कामगार नेते मा.श्री.अभिजीत राणे साहेब यांना
- dhadakkamgarunion0
- 6 hours ago
- 1 min read
छावा क्रांतिवीर सेनेचे अकरावे राष्ट्रीय महा अधिवेशन – मा. अभिजीत राणे साहेबांना सादर निमंत्रण
आज गोरेगाव,मुंबई येथे मुंबई मित्र समूहाचे संपादक व प्रख्यात कामगार नेते मा.श्री.अभिजीत राणे साहेब यांना छावा क्रांतिवीर सेनेच्या अकराव्या राष्ट्रीय महा अधिवेशनाचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले.
या वेळी निमंत्रण देताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर,प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. किरण डोके,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश दादा माने,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षद भोसले,कामगार आघाडी जिल्हा प्रमुख राहुल काकळीज,तसेच अविनाश तांदळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या अकराव्या महा अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून,क्रांतीशील विचारांचे पुनरुज्जीवन,युवकांचे प्रबोधन आणि समाज परिवर्तनाचा दृढ निर्धार या त्रिसूत्रीवर आधारित चर्चासत्रे, मार्गदर्शनपर सत्रे आणि निर्णय घेण्यात येणार आहेत.
मा. अभिजीत राणे साहेबांचे अमूल्य अनुभव,प्रभावी नेतृत्व व प्रेरणादायी विचार हे अधिवेशन अधिक प्रभावी व दिशा दर्शक ठरण्यात मोलाची भूमिका बजावतील,अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.








Comments