गोरेगाव विधानसभेच्या सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार विद्या ठाकूर यांची आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थित भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांचेही अभिनंदन केले. यावेळी सोबत धडक कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. मुरली पणीकर उपस्थित होते.
धडक कामगार युनियन ने विद्या ठाकूर यांना विधानसभा निवडणूकीत पाठिंबा जाहीर केला होता. स्वतः अभिजीत राणे यांनी गोरेगावमधील औद्योगिक वसाहतीत युनियन सभासदांच्या चौक बैठका घेतल्या होत्या. सर्व कामगार व रिक्षा चालक यांच्याच्या वतीने आज अभिजीत राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comentarios