top of page
dhadakkamgarunion0

*कामगार नेते अभिजीत राणे यांचे प्रेरणास्थान देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची साक्षीदार 'धडक कामगार युनियन'*

कामगार नेते अभिजीत राणे यांचे प्रेरणास्थान देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची साक्षीदार 'धडक कामगार युनियन'

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतून तब्बल 20 बसेस मुंबई व उपनगरांतून राज्याचे 21वे मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ग्रँड शपथविधी सोहळ्यासाठी "धडक"च्या विविध युनिट मधून सोडण्यात आल्या. यामध्ये भाजपा मुंबईचे विशेष सहकार्य मिळाले. याशिवाय धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत येणाऱ्या शेकडो रिक्षा चालकांनी अभिजीत राणे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत उपस्थिती लावली. यावेळी पवई मधून धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष व ठाणे/पालघर निरीक्षक बबन आगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बस निघाली. गोरेगाव (प.) येथून धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष फरीद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव (प.), एम जी रोड येथून बसेस निघाल्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (नॅशनल पार्क) येथून 2 बसेस वन कामगारांसोबत निघाल्या. कांदिवली (प.) शताब्दी हॉस्पिटल येथून 2 बसेस निघाल्या. धडक घरेलू कामगार संघटनेच्या माध्यमातून पोईसर व मालवणी येथून महिलांची बस काढण्यात आली. ठाणे येथील सिटी लाईफ ट्रॅव्हल्स येथून 2 बसेस निघाल्या होत्या. धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियनच्या माध्यमातून 1000 हुन अधिक युनियनच्या मूकबधिर सभासदांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

शपथविधी सोहळ्यास वेळातवेळकडून उपस्थित राहणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे आभार व अभिनंदन!

-जनसंपर्क विभाग

धडक कामगार युनियन महासंघ


 
















27 views0 comments

Comments


bottom of page