कांदिवली पूर्व विधानसभेचे पुन्हा एकदा निवडून आलेले आमदार अतुल भातखळकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले.
धडक कामगार युनियन ने भाजपा महायुतीस विधानसभा निवडणूकीत पाठिंबा जाहीर केला होता. स्वतः अभिजीत राणे यांनी मुंबई व उपनगरांत युनियन सभासदांच्या चौक बैठका तसेच व्हिडीओच्या सर्व कामगारांना आवाहन केले होते. त्यांच्यावतीने आज अभिजीत राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments