श्री राम जन्म भुमि अयोध्या येथे आज श्री राम ललाची प्राण प्रतिष्ठा दिनाचे औचित्य साधून भाजपा मुंबई सचिव व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव येथील त्यांच्या कार्यालयात ‘दिपोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी 108 दिव्यांची ‘जय श्री राम’ लिहलेली दिव्यांची आरास तयार करण्यात आली. याशिवाय हजारो दिवे कार्यालयाच्या परिसरात लाऊन संपूर्ण परिसर दीपमय करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अयोध्या मध्ये प्राण प्रतिष्ठा झालेल्या श्रीरामाचे छायाचित्रास पुष्प अर्पण करण्यात आले.
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, नागर शैलीत उभारले गेलेले हे मंदीर व त्यामध्ये असलेली श्री रामाची बाल रुपी मुर्ति ही श्री रामाच्या दहाही अवतारांची कीर्ति सांगते. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द, कलकी हे रामाचे अवतार या मुर्तित दिसतात. 500 वर्षांच्या हा लढा आज यशस्वी झाला असुन या मंदिरासाठी राजस्थान मधील बंसी पहाडपुर वरुन दगड आणले आहेत. न्यायालयीन लढा, आंदोलने, विविध सरकारे, कारसेवक, रथयात्रा हा प्रवास आपल्याला एक शक्ती देतो. आज त्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. त्याबद्दल तमाम हिंदु बांधवांना मी या शुभ दिनाचा शुभेच्छा देतो.
यावेळी झुल्लुर यादव, कुणाल जाधव, फरीद शेख, नितिन खेतले, बबन आगडे, सत्यविजय सावंत, आरती सावंत, रोहित गुडेकर, रवि बनसोडे, धडक कामगार युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठीत मान्यवर आदि उपस्थित होते.
Comentários