देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पालघर लोकसभा मतदारसंघातील धडक कामगार युनियनच्या 200 हुन अधिक युनिटच्या पदाधिकारी वकार्यकर्त्यांच्या मनोर येथील हॉटेल फर्न येथे आज धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेटी घेतल्या. यावेळी वसई, बोईसर, पालघर व वाडा येथील औद्योगिक वसाहतीतील नॅशनल मल्टिनॅशनल कंपन्यांच्या युनिट चे पदाधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील वन कर्मचारी व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून यावेळी चर्चा पार पडली.
top of page
bottom of page
Comments