विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन, संस्थापक अध्यक्ष -अभिजीत राणे युथ फाउंडेशन ) यांच्या मुख्य उपस्थितीत अभिषेक शिक्षण सामाजिक संस्थेच्या मार्फत वनीचा पाडा व खडकपाडा येथील आदिवासी मुलांसाठी स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप
गोरेगाव आरे येथील वनीचा पाडा व खडकपाडा या आदिवासी पाड्यातील तब्बल 85 मुलांना अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत त्याचप्रमाणे ईपीएस वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल डोमेस्टिक कुरिअर चे दिलीप साहू यांच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन आयोजकांचे कौतुक केले तसेच मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगुन त्यांना पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी मे.वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि.चे सी.ई.ओ. अमोल राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


























Comments