प्रगतीची आस त्याला कार्याची साथ!
भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार यांनी आज धडक कामगार युनियनच्या गोरेगावस्थित मुख्य कार्यालयास भेट देऊन युनियनचे सर्वेसर्वा विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर मुंबईचे उमेदवार पियुषजी गोयल यांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचेही आवाहन यावेळी केले. यावेळी धडक कामगार युनियनचे उत्तर मुंबई मतदारसंघातील विविध युनिट चे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यासारख्या विविध योजना आणि एमएसएमई सेक्टरला प्रोत्साहन देण्यातून भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना दिली. पियुषजी गोयल यांच्या माध्यमातून उत्तर मुंबई सर्वात मोठे हॉस्पिटल तयार केले जाणार आहे. कोरोना काळात जी मदत केंद्र सरकारकडून देण्यात आली ते खाते पियुषजी यांच्याकडेच होते. माननीय मोदींजींच्या मंत्री मंडळात पाचव्या क्रमांकाचे मंत्री ते आहेत अशी व्यक्तीच उत्तर मुंबईला सुख-सुविधा व खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देऊ शकते. असे यावेळी ते म्हणाले.
अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल व भेट वस्तू देऊन सत्कार केला.
Comments