विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (मुंबई सचिव - भारतीय जनता पार्टी, संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या माध्यमातुन धडक दिव्यांग मुक-बधिर कामगार युनियनच्या सभासदांसाठी नमो चषक -2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अॅड. श्री आशिष शेलार मुंबई अध्यक्ष - भारतीय जनता पार्टी मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी अॅड. श्री आशिष शेलार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. अॅड. श्री आशिष शेलार यांनी खेळाडुंना सन्मानचिह्न देऊन त्यांचे मनोबल वाढवले. वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि.चे सी.ई.ओ. अमोल राणे विषेश अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दि. 3 मार्च, 2024 रोजी सेंट पायस महाविद्यालय, गोेरेगाव पूर्व, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बुद्धीबळ, फुटबाॅल, क्रिकेट, कॅरम, बॅटमिंटन, टेबल टेनिस, वाॅली बाॅल, बास्केट बाॅल, चित्रकला, जलतरण स्पर्धा, छोटी मॅरेथाॅन आदि खेेळांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन महेश पवार, कुणाल जाधव, आरती सावंत, सत्यविजय सावंत, बबन आगडे यांच्या विशेष सहयोगाने करण्यात आला.
top of page
bottom of page
コメント