◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक इमारत बांधकाम कामगार युनियनच्या नववर्षाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शिवसेना ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमामध्ये झाले.
गजानन कीर्तिकर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, अभिजीत राणे हे धडाकेबाज कर्तव्यदक्ष आणि आक्रमक असे नेते आहेत. आपल्या परिसरातील अनेक कामगारांना त्यांनी युनियनच्या माध्यमातून न्याय मुळवून दिला आहे. कायद्याचे परिपूर्ण न्याय आणि उत्कृष्ठ लेखन कला त्यांच्या मध्ये असल्याने त्यांचे वृत्तपत्र ही समाजाला दिशा देण्याचे काम करते मी त्यांना शुभेच्छा देतो.
---------
Comments