◆ धडक कामगार युनियनच्या कॅलेंडरच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज भाजपा वर्सोवा विधानसभा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या हस्ते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी नगरसेवक योगीराज दाभाडकर, वार्ड क्र. 60 लोखंडवाला व नगरसेवीका रंजना पाटील, वार्ड 63 आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.
भारती लव्हेकर यांनी यावेळी बोलताना, एक उभारत नेतृत्व असून कामगार क्षेत्रात महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका ते निभावत आहेत. धडक कामगार युनियनच्या माध्यमातून कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड नक्कीच नव्या पीडिला प्रेरणा देणारी आहे. त्यांना भावीवाटचालीस खूप खूप शुभेच्छा! असे यावेळी त्या म्हणाल्या.
----------
Comentários