धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते श्री.अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथील वन कामगारांच्या झालेल्या अन्याय कारक बदल्यांविरोधात 2ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता तिव्र आंदोलन करुन आपला विरोध प्रकट केला.या वेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री.मल्लीकाजुॅन,वन संरक्षक व संचालक,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांची भेट घेवून वन कामगारांच्या झालेल्या अन्याय कारक बदल्यांसाठी चर्चा केली. धडक कामगार युनियन महाराष्ट्र वन कर्मचारी विभाग युनिट अध्यक्ष जॉनी वायके.,सचिव रमेश धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
top of page
bottom of page
コメント