धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनकडुन आज गोरेगाव येथे रिक्शा चालकांकडुन श्री राम जन्म भुमि अयोध्या येथे आज श्री राम ललाची प्राण प्रतिष्ठा दिनाचे औचित्य साधून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा मुंबई सचिव व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजीत राणे यांनी यावेळी सर्व रिक्शा चालकांना श्रीरामाचे छायाचित्र असलेली भगवी मफलर घातली. यावेळी रिक्शा चालकांनी जय श्री रामचा जयघोष करत सर्व परिसर दुमदुमुन सोडला. धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या आरे काॅलनी येथील आदर्श नगर व मयुर नगर युनिटकडुन आयोजन करण्यात आले.
top of page
bottom of page
Comments