धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियन मध्यवर्ती दुग्धशाळा आरे कामगारांच्या शिश्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन आपले विविध प्रश्न व समस्यांबाबत चर्चा केली. दुग्ध व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य आयुक्त वरळी मुंबई यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन आपले सर्व प्रश्न सोडवले जातील असे अभिवचन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिले. यावेळी धडक कामगार युनियनचे आरे युनिट पदाधिकारी सुरेश खंडागळे, झुल्लुर यादव, महेंद्र गांगुर्डे, चंद्रकांत चव्हाण, महादेव वाळकुंटे, ताहिद अंसारी, मुरगन तंगवेल, महिबन अंसारी, रंजना कुंभार, मीराबाई येडे, हीराबाई बरडे, अंजली गणेशन, आरती खुडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments