◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वाडा येथील प्राज हाय प्युरीटी सिस्टम लि. कंपनीच्या कामगारांना 'धडक' भेट दिली व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी युनियनचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच मंगेश पाटील व प्रमोद विशे यांनी संपूर्ण स्थानिक परिस्थितीची माहिती दिली.
यावेळी स्थानिक ज्येष्ठ नेते देवदत्त लेले (बापू काका), जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, युनियनचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, वाडा तालुकाध्यक्ष प्रमोद विशे व मोठ्याप्रमाणात कामगार वर्ग उपस्थित होता.
------------
Commenti