धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते, अभिजीत राणे यांनी शताब्दी रुग्णालयाचे सीनियर मेडिकल ऑफिसर डॉं.अजय गुप्ता यांची भेट घेतली. धडक कामगार युनियनचे सभासद असलेल्या रिक्षा चालकाच्या प्रकृती विषयी पाहणी करण्यासाठी कामगार नेते अभिजीत राणे शताब्दी रुग्णालयात आले होते.या वेळी अभिजीत राणे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रिक्षा चालकाच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याची विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. तसेच कामगारांच्या समस्या व प्रश्न याबाबतही व्यापक चर्चा केली.
धडक कामगार युनियन चे प्रवक्ते तसेच शताब्दी रुग्णालय युनियनचे युनिट प्रमुख अरुणकुमार गुप्ता, शताब्दी रुग्णालय युनियन उपाध्यक्ष महेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
Comentários