◆ महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सन्माननीय भगतसिंगजी कोश्यारी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी 'राजभवन' येथे आज सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ तसेच श्री गणेशाची मूर्ती देऊन सन्मान केला. भगतसिंगजी कोश्यारी व अभिजीत राणे यांच्यामध्ये महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली यामध्ये अभिजीत राणे यांनी कोविड काळातील राज्यशासनाच्या काही धोरणांमुळे हातावर काम करणाऱ्या कामगारांना मोठ्याप्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याबाबतीतील निवेदन अभिजीत राणे यांनी त्यांना दिले.
-------------------
Comments