धडक कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने आज डहाणू वनविभागाच्या वन संरक्षक यांची भेट घेऊन अनेक महिन्यापासून वन मजुरांच्या विविध समस्यांसंदर्भात भेट घेतली. पालघर जिल्ह्यात धडक कामगार युनियनचे शेकडो वन कामगार सद्स्य असून धडक कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांना दरवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असतो. आज कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियनच्या वन विभाग युनिट चे प्रमुख जॉनी वायके, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिटचे कार्यालय प्रमुख रमेश धुरी, भगवान तांदूळकर व वन मजुरांच्या उपस्थितीत डहाणू वन संरक्षक मधूमिता मॅडम यांची भेट घेतली. यावेळी डहाणू डिव्हिजनच्या वन मजुरांच्या मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेल्या पगारासंदर्भात व त्यांना दररोज काम देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा पार पडली. तसेच डहाणू डिव्हिजनच्या 95 वन मजुरांना दीड वर्षांपूर्वी ब्रेक देण्यात आला त्या संपूर्ण कामगारांची यादी देण्यात आली व त्यांना फेब्रुवारीपासून घेण्यासंदर्भाचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. याशिवाय कासा रेंजच्या काही कामगारांना ब्रेक दिला होता तर काहींचे पगार रखडले होते त्यासंदर्भात चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व जर पगार झाला नसेल तर पुढील 10 दिवसांत त्यांचा पगार देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. याशिवाय सर्व रेंजना तात्काळ पत्र पाठवून कामगारांचे पगार न थकवण्यासंदर्भात आदेश काढण्यात येणार असून पगार थकवल्यास रेंज अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश त्यांनी दिले. युनियनच्या शिष्टमंडळाकडून बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे वन संरक्षक यांचे आभार मानण्यात आले व कामगारांनी धडक कामगार युनियनचे आभार मानले. #dahanu #forest #mumbai #DKU #abhijeetrane #AR #meeting #nationalpark #borivali #kasa #maharashtra #goverment
top of page
bottom of page
Comentarios