संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी वनमजुरांकडून पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात आज रेवती अ. कुळकर्णी, उप संचालक (दक्षिण) बोरिवली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या कार्यालयात पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावत कामगारांच्या मागण्या लावून धरल्या. यावेळी वन अधिकाऱ्यांकडून 8 ते 9 मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सहाय्यक वनसंरक्षक सोनावाले, तुळशी रेंजचे परिक्षेत्र वन अधिकारी मुठे, कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके, युनिट सचिव रमेश धुरी, युनिट खजिनदार भगवान तांदुळकर आदी उपस्थित होते.
















Comments