◆ धडक कामगार युनियन संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व वन रक्षक भारोळ, सुनील धनगर यांच्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त पालघर, विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आज नियोजित बैठक पार पडली.
◆ यावेळी अस्थित कामगारांनी त्यांना नियमित काम दिले जात नाही नियमित पगार दिला जात नाही तसेच त्यांना महिन्यातून फक्त 15 दिवसांचे काम दिले जाते. उपस्थित व्यवस्थापन प्रतिनिधीनी जेव्हा काम उपलब्ध असेल तेव्हाच आम्ही त्यांना काम देतो. पगार डिसेंबर पर्यंत दिला आहे. त्यावर कामगारांनी पगार जुलै महिन्याचा पगार दिला नसल्याचे सांगितले.
◆ कामगारांना वेळेत व त्यांच्या खात्यात पगार देण्यात यावा असे व्यवस्थापनास सांगितले. आदी सर्व बाबींची शासन पातळीवर नोंद घेण्यात आली.
◆ यावेळी धडक कामगार युनियनचे संजय गांधी नॅशनल पार्क युनिट चे अध्यक्ष जॉनी वायके, जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव,भगवान तांदुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------
Comments