रिक्षा भाडेवाढीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांचे अभिनंदन करण्यासाठी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक, महासचिव अभिजीत राणे यांनी परिवहन आयुक्तांच्या करायला जाऊन भेट घेतली. यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी राज्य परिवहन आयुक्तांचे धडक ऑटो रिक्षा युनियनच्यावतीने आभार मानले. यादरम्यान मुंबई
ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष तंबी कुरियन, धडक ऑटो रिक्षा युनियन अध्यक्ष विजयशंकर मिश्रा आणि धडक ऑटो रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
Comentários