दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र (मराठी/हिंदी) चे समूह संपादक व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ आयोजित महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार 2023 वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रमाचे अतिथी संभाजीराजे जाधवराव यांच्या हस्ते अभिजीत राणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अतिथी म्हणून स्वाती ओक, आशा भोईर, संगीता गुरव, चारुशीला देशमुख, अमृता उत्तरवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक सदस्य सूरज भोईर यांनी केले होते. ------ #mumbaimitra #vruttamitra #abhijeetrane #AR #photo #pic #programe #journalist #dhadakkamgarunion #DKU
top of page
bottom of page
Comments