विरार येथील साई राज हॉस्पिटलचे आज बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आमदार सन्मा. हितेंद्र ठाकूर व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. अभिजीत राणे यांनी यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा शाल घालून सत्कार केला. अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, मला सन्माननीय अप्पांचा पितातुल्य असा कायमच आशीर्वाद मिळत असतो... आज त्यांच्याबरोबर कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळाली. असे यावेळी ते म्हणाले. हॉस्पिटलचे प्रमुख शिराज शेख, गिरिराज शुक्ला, मानिक गुप्ता आदी उपस्थित होते.
-------
Comments