◆ मिस - मिसेस इंटरनॅशनल नक्षत्र स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उत्साहात साजरा
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती
◆ इंटरनॅशनल आयकॉनिक नक्षत्र पुरस्काराचे वितरण
बोध एंटरटेनमेंट आयोजित मिस - मिसेस इंटरनॅशनल नक्षत्र 2023 चा महाअंतिम सोहळा मोठया उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धाकांची मेहनत सोहळ्याला प्रगती पथावर नेण्यात यशस्वी झाली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व आयोजकांचे आयोजनाबद्दल अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र कार्यक्रमाचा प्रायोजक होता.
मिस - मिसेस इंटरनॅशनल नक्षत्र स्पर्धेचा मिस विजेते - सार्था गोरे (मुंबई), मिसेस विजेते - धनश्री भाटे (टिटवाळा) यांनी बहुमान मिळावीला, मिस - मिसेस रणरप - मेरी फर्नांडिस, मिसेस सोनेल सिन्हा यांनी हा बहुमान मिळावीला, तर स्पर्धातील ऑइलाईन वोटिंग पद्धतीचा वापर करून लोक पसंतीची निवड फेस ऑफ नक्षत्र चा बहुमान वैशाली कांबळे, स्वाती शुक्ला या विजेत्या स्पर्धाकांना मिळाला, स्पर्धेची निवड प्रक्रिया प्रियांका मोरे व अनुष्का भुवड या नक्षत्राच्या माजी विजेत्यांनी परीक्षणातून केली. स्पर्धेचे गृमिंग अर्चना पवार, वेशभूषा मुक्ता नारळकर, रेजी क्रिएशन्स, रंगभूषा मनीषा कदम, सीमा पार्टे यांनी केले.
इंटरनॅशनल आयकॉनी पुरस्काराचे मानकरी डॉ. वनिता गडदे -राजे (सामाजिक/मनोरंजन), डॉ. श्वेता बाविस्कर (वैद्यकीय), कोमल डांगे (आर. जे.), एडवोकेट स्नेहल निकाळे (कायदेतज्ञ), मनस्वी चौधरी (पत्रकार), सुभाष जैन (पत्रकार), रुबीना धारवार (उदयोग/समाजसेविका), रुपाली गायके (अभिनेत्री), निकिता बर्गुंडे (अभिनेत्री) पुरस्काराचे मानकरी ठरले.
कार्यक्रमास माजी खासदार संजीव नाईक, ठा. म. पा. माजी नगरसेवक संजय वाघुले, किरण मनेरा यांच्या उपस्थिती 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन व 26/11 निमित्त वीर शहिद जवानांन प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून सुरुवात केली, तसेच पुढील कार्यक्रमाला टायटेन हॉस्पिटलचे संचालक डॉ. अब्रार खान, माजी नगरसेवक संजय तरे, माहेश्वरी तरे, विशाल तरे, मी सुधारक वृत्त पत्राचे संपादक प्रमोद इंगळे, मनसे नेत्या मंजुळा डाकी, ए. एस. मॅग्नेटिक इन्फ्रा प्रायव्हेट लि. संचालक अमित सिंग व काजल सिंग, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग अध्यक्ष नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मिस मिसेस इंटरनॅशनल नक्षत्र आयकॉनिक पुरस्कार सोहळा करता प्रायोजक संकपाळ उद्योग समूह, ए. एस. मॅग्नेटिक इन्फ्रा प्रायव्हेट लि., हीलुक्स तसेच न्यूज मराठी बाणा, आव्हान न्यूज, स्वराज्य न्युज, मुंबई मित्र, वृत्त मित्र, तरुण आव्हान, द फ्री प्रेस, लोकनायक, मी सुधारक, नवशक्ती, जनखुलासा, वृत्तसंग्राम या सर्वांचे आभार आयोजक सुबोध कांबळे, देवेंद्र शिंदे यांनी मांडले.
Comments