विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, मुंबई सचिव - भाजपा यांनी) नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडुन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार -2024 वितरण सोहळयास आयोजक सुनिल कुमरे यांच्या विनंतीस मान देऊन प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लावली. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती श्री अरुण चैधरी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन माजी जिल्हाधिकारी निर्मल कुमार देशमुख, माजी पोलिस महानिरीक्षक मोहन राठोड, मुंबई काॅंग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, उत्तर पश्चिम जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष क्लाव्हईस डायस आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजकांकडुन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 28 जानेवारी, 2024 रोजी डाॅ. भानुबेन नाणावटी कलाघर, नंदादीप विद्यालय,गोरेगाव पूर्व, मुंबई येथे करण्यात आले.
top of page
bottom of page
Comments