◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज नाशिक येथे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष व धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष करण गायकर यांचे वडील कै. पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांच्या प्रथम पुण्यसमरण कार्यक्रमास हजेरी लावली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले महाराज तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री सुरेश नवले आदी मान्यवर उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी प्रथम कै. पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रचंड कष्टातून त्यांनी आपले कुटुंब उभे केले. करण ला कधीच कुटुंबाची काळजी करावी लागली नाही कारण त्यांनी ती जबाबदारी पार पाडली... आज त्यांच्याच पुण्याईमुळे करण एवढे यश संपादन करू शकला. असे यावेळी ते म्हणाले.
----------
Comments