महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी कामगारांनी घेतली धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट
विविध विषयांवर व्यापक चर्चा
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी कामगारांनी धडक कामगार युनियनच्या गोरेगाव येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे माजी विभागीय उपाध्यक्ष अनंत पवार, अंबादास कांबळे, सुनिल मोरे यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिका-यांकडून संपात भाग घेतल्यामुळे कर्मचारी कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात असल्याची बाब तसेच कर्मचारी कामगारांचे प्रश्न व समस्या याबाबत या सदिच्छा भेटी मध्ये व्यापक चर्चा करण्यात आली.
एस.टी. महामहामंडळातील कर्मचारी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही तसेच शासन दरबारी त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील असे अभिवचन यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिले.
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई ठाणे विभागीय निरीक्षक बबन आगडे यांच्या समन्वयाने एस.टी. महामंडळातील कर्मचा-यांची भेट घडवुन आणली. महामंडळातील सुमारे 20 हजार कामगार लवकरच विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे नेतृत्व स्वीकारणार आहेत. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे हेच एस.टी. कर्मचा-यांना न्याय देऊ शकतात असा विश्वास धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई ठाणे विभागीय निरीक्षक बबन आगडे, अनंत पवार, अंबादास कांबळे, सुनिल मोरे यांनी व्यक्त केला आहे.
Comments