केंद्रिय मंत्री पीयुष गोयल व केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थिीत ‘धडक’चा कामगार मेळावा उत्साहात संपन्न
कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडुन कामगार मेळाव्याचे आयोजन
धडक कामगार युनियन महासंघचा कामगार मेळावा कांदिवली पश्चिम येथील भुराभाई हाॅल येथे हजारों कामगार व मान्यवरांचा उपस्थितीत पार पडला. कामगार मेळाव्यास कंेद्रिय मंत्री पीयुषजी गोयल, कंेद्रिय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर खासदार गोपाळजी शेट्टी, स्थानिक आमदार योगेश सागर, भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार, माजी नगरसेवक कमलेश यादव यांची विशेष उपस्थिती लाभली.
धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार, माजी नगरसेवक कमलेश यादव, धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष अॅड. नारायण पणीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी उपस्थित कामगारांच्या जनसमुदायाला संबोधित केले.
प्रमुख अतिथी कंेद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी सर्व कामगारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी मतदानाचे महत्व पठवुन देताना आपण दिलेले प्रत्येक हे मोदीजींचे हात बळकट करणार आहे, असे यावेळी ते म्हणाले.
कामगार शक्ति ही देशाची ताकत असुन त्यांना एकजुट ठेवण्याचे काम युनियन करत असते. त्यामुळे युनियन या शब्दात खुप मोठी ताकत असुन यांना एकत्र ठेवणारा युनियन लीडर कामगारांचे पुढील भविष्य ठरवत असतो. धडक कामगार युनियन ही तळागाळातील प्रत्येक कामगाराला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करत असते असे विचार अभिजीत राणे यांनी यावेळी मांडले.
अभिजीत राणे यांनी पीयुष गोयल व भागवत कराड यांचा शाल व भेट वस्तु देऊन सत्कार केला. यावेळी मंचावर वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि.चे सी.ई.ओ. अमोल राणे, कमलेष वैष्णव, धडक कामगार युनियनचे विविध युनिटचे पदाधिकारी महेश पवार, फरीद शेख, अभिजीत भोईटे, तौफिक शेख (जम्बो), गायकवाड मामा, झुल्लुर यादव, रहिम शेख, विन्सटन परेरा, अभय झा, उपंेद्र पंडित, गिरीराज शुक्ला, आबिद अली, कॅरेन टेरी रजा, काकोली मेघानी, सायरा सत्तानी, प्रदीप गौड, आरिफ मलिक, इल्तिजा हुसैन खान, मोहन जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुरज भोईर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितिन खेतले, अर्जुन म्हादळकर, सचिन म्हाडिक, बी.के. पांडे, आरती सावंत, रोहित गुडेकर, गणेश सावंत, आम्रपाली काळे, नन्हेलाल ओझा, रामचंद्र इंदप, मोहसीन शेख, विभांशु त्रिपाठी, फुरकान शेख, बबन आगडे, रवि बनसोडे, फरीद शेख, निशा शेख, सत्यविजय सावंत, शिला जाधव आदिंनी विशेष मेहनत घेतली.
#Dhadakkamgarunion #DKU #Piyushgoyal #Bhagwatkarad #Gopalshetty #yogeshsagar #Vinodshelar #Abhijeetrane #BJP #BJPmumbai #Mahayuti #BJPMaharashtra #Kamgarmelava #AR #Photo #update #exlusive #Narendramodi #Modi
Comments