गरजु दिव्यांग बांधवांना धडक कामगार युनियन रोजगारासाठी देणार लॅपटाॅप: अभिजीत राणे
धडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियनकडुन जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
1000 दिव्यांग बांधवांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते पाणी बाॅटलचे वाटप
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत येणा-या धडक दिव्यांग मुक - बधिर कामगार युनियन कडुन गोरेगाव येथील धडक भवन या मुख्य कार्यालयात युनियनचे सदस्य असलेल्या 1000 दिव्यांग बांधवांना स्टीलच्या पाणी बाॅटल्सचे धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणुन आरे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी जाधव, वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे, तौफिक शेख (जम्बो)उपस्थित होते. तसेच युनिटचे अध्यक्ष महेश पवार उपस्थित होते.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित पाहुण्यांचा शाल देऊन सत्कार केला व उपस्थितांना संबोधित करताना, ज्यांना रोजगार हवा आहे अशा गरजु दिव्यांग बांधवांना धडक कामगार युनियन महासंघच्या माध्यमातुन रोजगाराची संधी म्हणुन लॅपटाॅप देण्याची घोशणा यावेळी अभिजीत राणे यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विंन्सटन परेरा, बी.के.पांडे, प्रकाश पवार, गोबिंदर सिंह नेगी, आरती सावंत, बबन आगडे, रोहित गुडेकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
Comments