विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली (पूर्व),मुंबई येथे धडक कामगार युनियनच्या नामफलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण सोहळा संपन्न
बोरीवली (पूर्व),मंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि इतर वन मजूरांवर या पूढे कोणत्याही स्वरुपाचा अन्याय होणार नाही. श्रमिक कष्टकरी कामगारांच्या घामाला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केल्यास या पूढे श्रमिक कामगार पेटून उठेल अशा इशारा धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला.
सोमवार, दि. 12 फेब्रुवारी, 2024 रोजी धडक कामगार युनियनच्या नाम फलकाचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, युनिट येथे विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘या परिसरात हजारो कंपन्यांमध्ये लाखो कामगार काम करीत आहे. या कामगारांना कामगार कायदान्वये कंपनी व्यवस्थापनाने जे लाभ दिले पाहिजे ते कामगारांना मिळत नाही, आपल्या रोजगारावर गदा नको म्हणुन श्रमिक कष्टकरी कामगार आपल्यावर अन्याय होत असुन सुद्धा बोलायला तयार नाही, अशा कामगारांनी अता नोकरी गमवावी लागेल याची भिती न बाळगता अन्याय विरुद्ध आवाज उठवावा, कष्टक-यांच्या घामाला योग्य न्याय देण्यासाठी धडक कामगार युनियन पाठीशी खंभीरपणे उभी राहील, अशा जबरदस्त विश्वास विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी व्यक्त केला.
या वन मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यात यावा. या पुढे कामगारांवर कोणत्याही स्वरुपाचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला तेव्हा धडक कामगार युनियन जिंदाबाद, अभिजीत राणे जिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजयअषो ! आदि घोषणाने परिसर दणाणुन गेला.
या वेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जाॅनी वायके, युनिट सचिव रमेश धुरी, महेश पवार, अभय झा, प्रकाश निकम, रवि बनसोडे, फरीद शेख व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments