पियुष गोयल यांना निवडून आणण्यासाठी 'धडक' प्रतिबद्ध
------
महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुषजी गोयल यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना धडक कामगार युनियनचे समर्थनपत्र दिले. यावेळी दिलेल्या पाठींब्याबद्दल पियुषजी गोयल यांनी अभिजीत राणे यांचा शाल घालून सत्कार केला.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात धडक कामगार युनियनची मोठी ताकद असून संजय गांधी उद्यानचे सर्व वन कर्मचारी धडक कामगार युनियनचे सभासद आहेत. लोखंडवाला, बोरिवली गेट नं.1, गेट नं 3, विलासराव देशमुख गार्डन कांदिवली, कामगार हॉस्पिटल, संजय गांधी उद्यान, गोकुळ गॅलकसी, टिपू सुलतान (मालवणी), नूर मस्जिद (मालवणी), फाउंडेशन स्कुल (लोखंडवाला) आदी विविध ठिकाणी धडक ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे स्टँड असून शेकडो रिक्षा चालक 'धडक' युनियन चे सभासद आहेत.
यावेळी सोबत भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार उपस्थित होते.
#BJP # #बोरिवली #DKU #dhadakkamgarunion #पियुषगोयल #piyushgoyal #mumbaiBJP #abhijeetrane #AR #vinodshelar
Comments