◆ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील कामगारांचे आंदोलन यशस्वी!
◆ उद्यान प्रशासनाकडून कामगारांच्या मागण्या मान्य
---------
◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आंदोलनात कामगारांचा विजय!
---------
मुंबई : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वन कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यावेळी शेकडो कामगार उपस्थित होते. कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही आदी विविध घोषणांनी उद्यान परिसर दुमदुमून गेला होता. अभिजीत राणे यांनी यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांच्या मागण्यांसंदर्भात रेवती अ. कुळकर्णी, उप संचालक (दक्षिण) बोरिवली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यासोबत चर्चा केली यावेळी त्यांनी कामगारांच्या केलेल्या बदल्याना स्थगिती दिली. तसेच बाकी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट-गमबुट तात्काळ देण्याचे मान्य केले तसेच महिनाभरात टॉर्च उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. व बाकी 8 ते 9 मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीत कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके, युनिट सचिव रमेश धुरी, युनिट खजिनदार भगवान तांदुळकर, आदी उपस्थित होते.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी कामगारांना संबोधित करताना, आंदोलन संपले नसून स्थगित केले आहे वन प्रशासनाने आपल्या सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. असे यावेळी ते म्हणाले.
जॉनी वायके यांनी मोठ्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहिल्या बद्दल कामगारांचे आभार मानले.
Comments