◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ व इतर मागण्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस रिक्षा व टॅक्सी चालकांचा प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. यावेळी रिक्शा व टॅक्सी भाडेवाढ संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मंत्री महोदयांनी लवकरच रिक्षा व टॅक्सी चालकांच्या महामंडळासंदर्भात घोषणा करण्यात येईल असे आश्वासन दिले. उद्या या बाबत सविस्तर चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी टॅक्सी मेन्स युनियनचे श्री. फ्रेड्रिक डिसा, क्वाड्रस, सालियन, रिक्षा मेन्स युनियनचे श्री. तंबी कुरियन, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे श्री. राजन देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक व सरचिटणीस जोडेकर व विविध रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
-------------------
#dhadakautorickshawtaxiunion #abhijeetrane #AR #photo #meeting #mantralaya #mumbai #auto #taxi #udaysamant
Comments