विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी दि. 15 जून, 2023 रोजी नवी मुंबई स्पोटर्स क्लब, नवी मुंबई येथे पूर्वनियोजित बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी अॅॅप बेस वाहनांसाठी महाराष्ट्र रेग्युलेशन आॅफ द एग्रिगेटर रुल्स, 2022 तयार करण्यासाठी गठित केलेल्या समितीमध्ये विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनतर्फे आपले मत मांडले. यावेळी श्री शेखर चन्ने (आय.ए.एस, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य), श्री विवेक भीमनवार (आय.ए.एस, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य), जितेंद्र पाटील (समिती सदस्य तथा अपर परिवहन आयुक्त) व परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments